1.4 When Should a Society Consider Redevelopment? - १.४ गृहनिर्माण संस्थेने पुनर्विकासाचा विचार कधी करावा?

1.4 गृहनिर्माण संस्थेने पुनर्विकासाचा विचार कधी करावा?


गृहनिर्माण संस्थेने पुनर्विकासाचा विचार केवळ इमारत जुनी झाली म्हणूनच करावा असे नाही. इमारतीची सद्यस्थिती, संरचनात्मक सुरक्षितता, दुरुस्तीचा वाढता खर्च, उपलब्ध विकास क्षमता, सभासदांच्या भविष्यातील गरजा, परिसरातील जमिनीचे मूल्य आणि पुनर्विकासातून मिळणारे संभाव्य फायदे या सर्व बाबींचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.

1.4 When Should a Society Consider Redevelopment?

A housing society should not consider redevelopment merely because its building has become old. The decision should be based on a comprehensive assessment of the building's present condition, structural safety, increasing repair costs, development potential, members' future requirements, land value in the locality, and the potential benefits that redevelopment may provide.

1.4.1 इमारत जुनी व जीर्ण झाली असल्यास

इमारतीचे वय वाढल्यामुळे तिच्या संरचनात्मक व इतर बांधकाम घटकांमध्ये झीज होऊ शकते. वारंवार होणारी गळती, काँक्रीटचा क्षय, लोखंडी सळ्यांना गंज येणे, प्लास्टर पडणे, भेगा, जुन्या पाइपलाइन, विद्युत व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांची अवस्था चिंताजनक असल्यास पुनर्विकासाचा गांभीर्याने विचार करावा.

1.4.1 When the Building Has Become Old and Dilapidated

When a building becomes old and deteriorated, its structural and other construction components may experience significant wear and tear. Frequent leakage, concrete deterioration, corrosion of reinforcement, falling plaster, cracks, outdated plumbing, electrical systems and other infrastructure may justify serious consideration of redevelopment.

1.4.2 वारंवार व महागड्या दुरुस्त्या कराव्या लागत असल्यास.

एखाद्या इमारतीवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचा खर्च होत असेल आणि त्याच समस्या पुन्हा पुन्हा निर्माण होत असतील, तर केवळ दुरुस्ती करत राहणे आर्थिकदृष्ट्या योग्य आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे.

1.4.2 When Frequent and Costly Repairs Are Required

If the society is spending substantial amounts every year on repairs and the same problems keep recurring, it should evaluate whether continuing with repairs is economically sensible or whether redevelopment would provide a more sustainable long-term solution.

1.4.3 संरचनात्मक ऑडिटमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यास                                                  

अधिकृत तज्ज्ञांकडून करण्यात आलेल्या Structural Audit मध्ये इमारतीच्या संरचनेमध्ये गंभीर त्रुटी, कमकुवतपणा किंवा सुरक्षिततेशी संबंधित समस्या आढळल्यास त्या अहवालाचा गांभीर्याने विचार करावा. मात्र, Structural Audit मध्ये दुरुस्ती, strengthening किंवा redevelopment यापैकी कोणता पर्याय योग्य आहे हे तज्ज्ञांच्या निष्कर्षांवर आधारित ठरवले पाहिजे.

1.4.3 When Serious Deficiencies Are Identified in the Structural Audit

If a structural audit conducted by a qualified professional identifies serious structural deficiencies, weaknesses or safety concerns, the society must carefully consider the findings. However, whether repair, structural strengthening or redevelopment is appropriate should be determined on the basis of professional technical advice rather than assumption.

1.4.4 दुरुस्तीचा खर्च पुनर्विकासाच्या तुलनेत अवाजवी असल्यास 

मोठ्या प्रमाणात structural repairs, waterproofing, plumbing, electrical replacement, lift replacement, fire-safety improvements and other capital works आवश्यक असल्यास त्यांचा एकत्रित खर्च किती येईल याचे मूल्यांकन करावे. हा खर्च दीर्घकालीन लाभांच्या तुलनेत disproportionate असल्यास redevelopment अधिक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो.

1.4.4 When the Cost of Repairs Is Excessive Compared to Redevelopment

Where substantial structural repairs, waterproofing, plumbing, electrical replacement, lift replacement, fire-safety improvements and other capital works are required, their total estimated cost should be assessed. If such expenditure becomes disproportionate to the long-term benefits obtained, redevelopment may become a more viable alternative.

1.4.5 सभासदांना आधुनिक व अधिक चांगल्या सुविधांची आवश्यकता असल्यास.                जुन्या इमारतींमध्ये आधुनिक लिफ्ट, पुरेशी पार्किंग व्यवस्था, अग्निसुरक्षा, दिव्यांगांसाठी सुविधा, चांगली पाणीपुरवठा व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, आधुनिक विद्युत व्यवस्था आणि इतर amenities उपलब्ध नसू शकतात. सभासदांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुनर्विकासाचा विचार करता येतो.

1.4.5 When Members Require Modern and Better Amenities

Older buildings may lack modern lifts, adequate parking, fire-safety systems, accessibility facilities, reliable water supply, waste-management arrangements, security systems, modern electrical infrastructure and other amenities. Redevelopment may therefore be considered to meet the changing needs of society members.

1.4.6 विद्यमान सदनिका अपुऱ्या ठरत असल्यास. 

कुटुंबांचा आकार, जीवनशैली आणि कामाच्या पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे जुन्या काळातील लहान सदनिका आजच्या गरजांसाठी अपुऱ्या ठरू शकतात. लागू असलेल्या विकास नियमांनुसार अतिरिक्त क्षेत्रफळ मिळण्याची शक्यता असल्यास पुनर्विकास हा एक पर्याय असू शकतो.

1.4.6 When the Existing Flats Are No Longer Adequate

Existing flats may become inadequate as family sizes, lifestyles and working patterns change. If the applicable development regulations permit the possibility of obtaining additional usable area, redevelopment may provide an opportunity to address these requirements.

1.4.7 जमिनीची विकास क्षमता अद्याप पूर्णपणे वापरली नसल्यास.

काही जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या भूखंडावर उपलब्ध असलेली FSI/FAR, TDR किंवा इतर विकास क्षमता पूर्णपणे वापरलेली नसू शकते. अशा परिस्थितीत विद्यमान जमीन व लागू विकास नियमांचा अभ्यास करून redevelopment financially feasible आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे.

1.4.7 When the Development Potential of the Land Has Not Yet Been Fully Utilised

In some older housing societies, the development potential of the plot—such as permissible FSI/FAR, TDR or other applicable development rights—may not have been fully utilised. The society should therefore assess the plot and applicable development regulations to determine whether redevelopment is financially and technically feasible.

1.4.8 परिसरातील जमीनमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले असल्यास

ज्या परिसरात जमिनीचे बाजारमूल्य आणि real-estate demand मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तेथे जुन्या इमारतीचा redevelopment करून उपलब्ध development potential चा योग्य वापर केल्यास सभासदांना आर्थिक व मालमत्तेच्या दृष्टीने अधिक चांगला लाभ मिळण्याची शक्यता असते.

1.4.8 When the Land Value in the Surrounding Area Has Increased Significantly.

Where land values and real-estate demand in the locality have increased substantially, redevelopment may allow the society to better utilise its development potential and potentially provide members with improved property and financial benefits.

1.4.9 इमारतीच्या दुरुस्तीपेक्षा पुनर्विकासातून दीर्घकालीन फायदा अधिक असल्यास

निर्णय घेताना केवळ आजचा खर्च पाहू नये. पुढील 20–30 वर्षांमध्ये दुरुस्ती, maintenance, major replacement आणि structural strengthening यावर किती खर्च होऊ शकतो आणि redevelopment नंतर कोणते दीर्घकालीन फायदे मिळतील याचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे.

1.4.9 When Redevelopment Offers Greater Long-Term Benefits Than Repair and Maintenance

The decision should not be based solely on today's expenditure. The society should compare the likely costs of repairs, maintenance, major replacements and structural strengthening over the next 20–30 years with the long-term benefits that redevelopment may provide.

1.4.10 मात्र — प्रत्येक जुन्या इमारतीचा पुनर्विकास करणे आवश्यक नाही.

इमारत जुनी आहे, म्हणून redevelopment करणे बंधनकारक किंवा आपोआप योग्य ठरत नाही. काही इमारती योग्य structural condition मध्ये असू शकतात आणि त्यांना आवश्यक दुरुस्ती व strengthening करून अनेक वर्षे सुरक्षितपणे वापरता येऊ शकते. त्यामुळे "इमारत जुनी आहे का?" या प्रश्नाबरोबरच "दुरुस्ती करणे अधिक योग्य आहे की पुनर्विकास?" हा मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे.

1.4.10 However — Not Every Old Building Needs to Be Redeveloped

However, not every old building necessarily requires redevelopment. Some buildings may remain structurally sound and can continue to be used safely for many years after appropriate repairs and strengthening. Therefore, the fundamental question should not merely be "Is the building old?" but rather "Is repair and strengthening more appropriate, or is redevelopment the better long-term option?"

1.4.11 अंतिम निर्णय घेण्यापूर्वी व्यवहार्यता तपासणी

पुनर्विकासाचा निर्णय घेण्यापूर्वी Structural Audit, land/title due diligence, development-potential assessment, feasibility study, financial analysis, applicable planning and development regulations, members' requirements and risks यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानंतरच सभासदांसमोर वस्तुनिष्ठ माहिती ठेवून पुढील निर्णयप्रक्रिया सुरू करावी.

1.4.11 Feasibility Assessment Before Taking the Final Decision.

Before taking a final redevelopment decision, the society should independently examine the structural audit, land and title due diligence, development potential, feasibility study, financial viability, applicable planning and development regulations, members' requirements and associated risks. Only after this objective assessment should the information be placed before the members and the formal decision-making process proceed.

महत्त्वाचा निष्कर्ष

पुनर्विकासाची योग्य वेळ ठरवण्याचा सर्वोत्तम आधार म्हणजे इमारतीचे वय नव्हे, तर तिची संरचनात्मक स्थिती, दुरुस्तीचा दीर्घकालीन खर्च, उपलब्ध विकास क्षमता, सभासदांच्या गरजा आणि पुनर्विकासाची आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता यांचा एकत्रित अभ्यास होय.

Important Conclusion

The best basis for deciding whether it is time for redevelopment is not the age of the building alone, but a combined assessment of its structural condition, long-term repair costs, available development potential, members' requirements, and the technical and financial feasibility of redevelopment.

गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाची ३० टप्प्यांची प्रक्रिया - (30-Step Process of Redevelopment of a Housing Society).

  गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाची ३० टप्प्यांची प्रक्रिया 30-Step Process of Redevelopment of a Housing Society 1. पुनर्विकास समजून घेणे...